विचारा त्यांना महत्व
सणासुदीतल्या गोडधोडीचे
तरळते ज्यांच्या लेकराबाळांच्या जिभेवर
चव शाळेतल्या खिचडीची खारट
गिळतात मिटुन डोळे घासाबरोबर अळ्या
कोमेजतात उपासमारीच्या उन्हात
-अजीम नवाज राही
मोठ्यास मोठे मान तू, त्याहून मोठे चिंतता;
पण आपणाही फार छोटे तू उगा मानू नको
विवेक, संयम, नम्रता... असले सदाचे सोबती
तरी व्हायचे वेडे जिथे, तेथे मढे होऊ नको!
-विं. दा. करंदीकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा